एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट स्पर्धा
पुणे – ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत नॉर्थन ट्रस्ट संघाने टॅलेंटीका संघाचा तर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एचडीएफसी संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ई2डी क्रिकेट मैदान लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विजय परांदेच्या 68 धावांच्या बळावर नॉर्थन ट्रस्ट संघाने टॅलेंटीका संघाचा 30 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना नॉर्थन ट्रस्ट संघाने 20 षटकांत 7 बाद 169 धावा केल्या. 169 धावांच्या आव्हानाचा पाठगाल करताना सुरेश एम, मयुर सपकाळ, धनुष होला व जय लोबे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीका संघ केवळ 17.5 षटकांत सर्वबाद 139 धावांत गारद झाला.
दुसऱ्या लढतीत झैद पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एचडीएफसी संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना झैद पटेल व विराज काकडे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एचडीएफसी संघ 15.5 षटकांत सर्वबाद 80 धावांत गारद झाला. 80 धावांचे लक्ष सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने ऋषी राऊतच्या नाबाद 32, ओमकार पाटीलच्या नाबाद 18 तर सिध्देश वरघंटे 19 धावांसह केवळ 7.4 षटकांत 1 बाद 82धावांसह सहज पुर्ण करत विजय संपादन केला. 24 धावांत 4 गडी बाद करणारा झैद पटेल सामनावीर ठरला.
सविस्तर निकाल – साखळी फेरी
नॉर्थन ट्रस्ट – 20 षटकांत 7 बाद 169 (विजय परांदे 68, सचिन चव्हाण 23, राहूल मुद्राल्लीवार 2-29, विशाल शिंदे 2-26, राहुल कुलकर्णी 2-15, मोहित सार्डे 1-24) वि.वि टॅलेंटीका- 17.5 षटकांत सर्वबाद 139 (रूपम दास 54, रामकृष्ण वर्मा 34, वसिफ काझमी 19, सुरेश एम 3-18, मयुर सपकाळ 2-22, धनुष होला 2-32, जय लोबे 2-6).
एचडीएफसी – 15.5 षटकांत सर्वबाद 80 (प्रशांत जाधव 15, निर्मल हर्षे 14, झैद पटेल 4-24, विराज काकडे 2-0, वैभव अगरकर 1-6, ओमकार पाटील 1-18, अजित घावणे 1-4) पराभूत वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन : 7.4 षटकांत 1 बाद 82 (ऋषी राऊत नाबाद 32, ओमकार पाटील नाबाद 18, सिध्देश वरघंटे 19, अविनाश जाधव 1-27).