मुंबई : टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी टीव्हीवरील अनेक दिग्गज कलाकार या शोमध्ये सहभागी होणार आहेत. इंटरनेट सेन्सेशन जन्नत जुबैर यावेळी खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसणार आहे.
स्टंट आधारित रिअॅलिटी शोमध्ये जन्नत जुबेरला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार, जन्नत जुबैर खतरों के खिलाडी 12 शोची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वृत्तानुसार, टीव्हीची सर्वात मोठी अभिनेत्री रुबिना दिलीक, इंटरनेट सेन्सेशन मिस्टर फैझू आणि मुनावर फारुकी या स्टार्सला मागे टाकून जन्नत झुबेर शोची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
एका एपिसोडसाठी जन्नत जुबेर किती पैसे घेते?
रिपोर्टनुसार, जन्नत जुबेर एका एपिसोडसाठी 18 लाख रुपये घेत आहे. जन्नत जुबेरनंतर मिस्टर फैजू 17 लाख रुपये घेत आहेत. त्याचवेळी, अनेक रिपोर्ट्समध्ये असे देखील बोलले जात आहे की रुबिना दिलीक देखील शोसाठी मोठी रक्कम घेत आहे.
खतरों के खिलाडी शोमध्ये या सर्व टॉप स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुकता दिसून येत आहे. प्रतीक सहजपाल, तुषार कालिया यांच्यासह अनेक जण शोमध्ये धमाल करायला तयार आहेत. आता रोहित शेट्टीच्या शोमधील कोणता स्टार अवघड स्टंट निर्भयपणे करून चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.