Tejaswini Pandit – मालिका, वेबसिरीज आणि सिनेमा अशा विविध कलाकृतींद्वारे आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित’ (Tejaswini Pandit). तेजस्विनीने सर्वच फॉरमॅटमध्ये आपल्याला सिद्ध केलं आहे. म्हणूनच तेजस्विनीचा (Tejaswini Pandit) चाहता वर्ग मोठा आहे.
तेजस्विनी सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टिव्ह असते. शूटिंग असो वा व्हेकेशन ती आपल्या प्रत्येक गोष्टींची अपडेट चाहत्यांना देत असते. अभिनयाव्यतिरिक्त तेजस्विनी तिच्या बेधडक स्वभावासाठी विशेष ओळखली जाते. तेजस्विनी समाजातील अनेक घडामोडींवर अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनीने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी देखील तिने अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच राजकारणाबाबतही तिचे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना तेजस्विनी म्हणाली, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे…त्यांचं नाही.”
पुढे ती “तुम्ही जर जबाबदार व्यक्तिमत्त्व आहात, तर तुमची भूमिका मांडताना तुमच्याजवळ क्लॅरीटी असली पाहिजे. जर ती नसेल तर समोरच्याचा मनात चीटिंग केल्याची भावना येते. मग मी प्रश्न विचारणारच आहे. मग ते तुम्हाला का झोंबतंय?” असंही म्हणाली. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.