DRDO RAC Scientist Recruitment 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने वैज्ञानिक ‘C’, वैज्ञानिक ‘D’, वैज्ञानिक ‘E’ आणि वैज्ञानिक ‘F’ च्या पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी DRDO मध्ये सामील होण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
DRDO रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटर (RAC) ने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे, पात्र उमेदवार 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे DRDS RAC अंतर्गत Scientist ‘C’, Scientist ‘D’, Scientist ‘E’ आणि Scientist ‘F’ च्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैज्ञानिक ‘क – 27 पदे, वैज्ञानिक ‘डी’ – 8 पदे, वैज्ञानिक ‘ई’ – 14 पदे, वैज्ञानिक ‘एफ’ – 2 पदे अशी एकूण 51 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
कोण अर्ज करू शकतो?
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवीधर असणे आवश्यक आहे. वैज्ञानिक ‘D’/’E’/’F’ साठी वयोमर्यादा 50 वर्ष आणि वैज्ञानिक ‘C’ साठी 40 वर्षापर्यंत आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासावी.
अर्ज कसा करावा ?
– RAC च्या अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जा.
– होम पेजवर उपलब्ध असलेल्या DRDO RAC सायंटिस्ट रिक्रूटमेंट 2023 लिंकवर क्लिक करा.
– नोंदणी तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.
– लॉग इन करा आणि अर्ज भरा.
– आता अर्ज फी भरा.
– सबमिट लिंकवर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
– पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
एवढा मिळेल पगार –
वैज्ञानिक ‘सी -. रु. 67,700 (स्तर वेतन-11)
वैज्ञानिक ‘डी’ – रु 78,800 (स्तर-12)
वैज्ञानिक ‘ई’ – रु 1,23,100 (स्तर-13)
वैज्ञानिक ‘एफ’ – रु 1,31,100 (स्तर-13A)
अर्ज फी किती आहे ?
सामान्य, OBC आणि EWS पुरुष उमेदवारांना 100 रुपये नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरावी लागेल. फक्त ऑनलाइन द्वारेच फी भरता येईल. SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार RAC DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.