मुंबई – मराठीमध्ये पहिल्यांदयाच नवीन शैलीवर आधारित एक हॉरर चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठी भाषेत यापूर्वी अनेक वेगवेळ्या विषयांवर हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले आहे. मात्र ‘काळ’ चित्रपटाची सादरीकरणाची पठडी पूर्ण पणे वेगळी आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
दरम्यान, २४ जानेवारी २०२० रोजी ‘काळ’ या हॉरर चित्रपटाचा थरार संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.