शिक्षक, अधिकाऱ्यांसाठी “नवोपक्रम’

अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने उपक्रम

पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी राजस्तरीय ऑनलाइन “नवोपक्रम’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रात एक नवे चैतन्य आले आहे. राज्यातील प्रत्येक मुल प्रगत व्हावे यासाठी प्रत्येक शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळातही शिक्षक व अधिकारी नवनवीन उपक्रम व कल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग नवोपक्रमशील शिक्षक करीत आहेत.

शिक्षकांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला अधिक गती देण्यासाठी व नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी नवोपक्रम स्पर्धा घेण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.