पुणे – नवरात्रोत्सव सुरू असल्याने आणि पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतल्याने काढणी झाल्याने मार्केट यार्डात फुलांची आवक वाढली आहे.
मात्र, बाजारात दाखल होणाऱ्या मालाची प्रतवारी खराब आहे. त्यामुळे आणि आवकेपेक्षा मागणी कमी असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या भावात घसरण झाली.
मंदिरे बंद, लग्न आणि इतर कार्य नसल्याने फुलांना फारशी मागणी नाही. तरीही घटस्थापनेनंतर काही प्रमाणात मागणी होत आहे. मंदिरे उघडल्यास फुलांना मागणी वाढण्याची शक्यता व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविली.