टीचर्स लीगला आजपासून सुरूवात

पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आंतर महाविद्यालयीन शिक्षकांच्या क्रीडास्पर्धा 2019 “टीचर्स लीग’ ही स्पर्धा बुधवार दि. 24 एप्रिल ते सोमवार दि. 29 एप्रिल या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडांगणावर होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 60 महाविद्यालयांचे 600 स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन 24 एप्रिल रोजी सायं.4.00 वाजता एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडांगणावर होणार आहे. या

समारंभासाठी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व छत्रपती पुरस्कार विजेती मा. सायली केरीपाळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, सोमवार दि. 29 एप्रिल रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

या स्पर्धेत क्रिकेट (पुरूष व महिला), व्हॉलीबॉल (पुरूष), थ्रोबॉल (महिला), बॅडमिंटन (पुरूष व महिला) व टेबल टेनिस (पुरूष व महिला) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या क्रीडा स्पर्धेत एकुण 60 संघ सहभागी होत आहेत. त्यात क्रिकेट (पुरूष) 18 महाविद्यालये व महिलांचे 4 महाविद्यालये आहेत. व्हॉलीबॉल (पुरूष) 18 महाविद्यालये, बॅडमिंटन 20 महाविद्यालये, टेबल टेनिस 12 महाविद्यालये व थ्रो बॉल (महिला) स्पर्धेत 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम अशा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांची बक्षिसे व प्रशस्तीपत्रके दिली जातील. सर्वसाधारण विजेत्या संघाला करंडक व 51 हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेता व उपविजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.