कन्नुर (केरळ) – कन्नुर लोकसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन मध्ये साप असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर त्या मतदान केंद्रावर थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. माय्यील कंदक्कई मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. त्या मतदान केंद्रावर सकाळी मतदारांची मोठीच गर्दी झाली असताना हा प्रकार घडला.
मतदान केंद्रावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या सापाला बाहेर काढल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडली. या धावपळीत व्हीव्हीपॅट मशिनला कोणताही धक्का लागणार नाही याची दक्षता सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेतली होती. या गोंधळात पंधरावीस मिनीटांचा खंड मतदान प्रक्रियेत पडला. या केंद्रातील अन्यही व्हीव्हीपॅट मशिन्सची तपासणी केली गेली.