अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मतदार संघातील आपल्या मतदान केंद्रावर सकाळी मतदान केले. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही तिथे उपस्थित होते. शहराच्या रानीपा भागातील निशान हायस्कूल मध्ये त्यांचे नाव आहे. ते तेथे खुल्या जीप मधून आले. आणि त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्यांना अभिवादन करीत मतदान केले. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित शहा हे निवडणूक लढवत आहेत.
मतदानानंतर बोलताना ते म्हणाले की लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचाहक्क बजावल्यानंतर मला समाधान वाटले. मतदारआयडी कार्डाची शक्ती ही अतिरेक्यांच्या आयईडी स्फोटकांपेक्षा अधिक असते असे विधानही त्यांनी यावेळी केले. मतदान केल्यानंतर ते मतदान केंद्राच्या बाहेर काही अंतर चालत गेले आणि लोकांना अभिवादन करीत त्यांनी पत्रकारांशीही थोडक्या वेळात प्रतिक्रीया देत ते पुन्हा उघड्या जीपने रवाना झाले.