मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, तारक मेहता मालिकेतील आणखील एक लोकप्रिय पात्र नट्टू काका यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार, नट्टू काका म्हणजेच जेष्ठ अभिनेते ‘घनश्याम नायक’ यांना घशाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या घशाची एक शस्रक्रिया सुद्धा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
घनश्याम नायक हे गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्यामुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. त्यामुळे सोशल मीडियावरही होणार्या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत आहेत.