नवी दिल्ली – दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चित्रपटातील गाण्यांवर अनेक सोशल मीडिया कलाकार व्हिडिओ रील तयार करत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अश्यातच टांझानियाच्या किली पॉल आणि नीमा यांचा सुद्धा ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सिया राम’ या गाण्यावरील रील व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या रीलवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
या गाण्यावरील रील किली पॉल आणि त्याची बहीण नीमा यांनी शेअर केलं आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘श्री राम,जय हिंद’. दरम्यान, ‘जय श्री राम’ या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.