जबलपूर – मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (जबलपूर) बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानचे पुस्तक ‘करिना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ प्रकरणी नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने पुस्तकाच्या सह-लेखिका अदिती शाह भीमजियानी, अँमेझॉन इंडिया आणि जुगरनॉट बुक्सकडूनही उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे. नावाला बायबल जोडल्याने ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. अँथनी म्हणाले की बायबल हा ख्रिश्चन धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे. प्रभु येशूच्या शिकवणीचे वर्णन या पवित्र ग्रंथात आढळते. करिनाच्या पुस्तकात बायबलचा वापर दुखावणारा आहे. करिना कपूरने 9 ऑगस्ट 2021 रोजी गर्भधारणेवर लिहिलेले हे पुस्तक लॉन्च केले. या पुस्तकाला त्यांनी त्यांचे तिसरे अपत्य म्हटले. पुस्तकाच्या लाँचच्या वेळी तिने करण जोहरशी ऑनलाइन चर्चा केली आणि गरोदरपणात आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबद्दल सांगितले. करिनाने सांगितले की, पहिल्या प्रेग्नेंसीच्या तुलनेत दुसरी गर्भधारणा तिच्यासाठी कठीण होती.