सोलापूर : ठाकरे परिवाराला आव्हान देणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांचे पंख छाटायला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद झेडपीच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्यासोबत न जाता भाजपसोबत जाऊन पुतण्याला उपाध्यक्षपदी बसविणार सावंत आणि त्यांच्या कृतीचे समर्थन करणारे सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची शनिवारी हकालपट्टी करण्यात आली आहे.
त्यानंतर रविवारी पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचा पदभार काढून कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे, तर सोलापूर शहर शिवसेनेचे अध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांचा पदभार काढून तरुण आणि अभ्यासू नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोहोळ तालुकाप्रमुख महेश देशमुख यांचासुद्धा पदभार काढण्यात आला आहे. त्यांच्या जागी अशोक भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.