राजघराण्यातील सर्व सदस्यांची बोलावली बैठक
लंडन – प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांनी राजघराण्याचे सर्व अधिकार सोडल्याचे जाहीर केल्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यात अनपेक्षित कौटुंबिक संकट समोर उभे ठाकले आहे. या राजदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयामुळे राजघराण्यामध्ये फुट पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसायला लागली आहेत. या गृहकलहाला सोडवण्यासाठी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रिन्स हॅरी यांच्याशी थेट चर्चा करायचे ठरवले आहे. हॅरी आणि अन्य कुटुंबीयांना महाराणी एलिझाबेथ यांनी विशेष बैठकीसाठी पाचारण केले आहे.
प्रिन्स हॅरी, त्यांच्या पत्नी ड्युक ऑफ ससेक्स (मेघन मर्केल), हॅरी यांचे बंधू विल्यम्स, त्यांच्या पत्नी ड्युक ऑफ केंब्रिज आणि प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) यांना महाराणींच्या नोरफोल्क येथील ऍन्ड्रिंगहॅम राजप्रासादातील या बैठकीला निमंत्रित केले गेले आहे. मेघन मर्केल सध्या आपल्य 8 महिन्याच्या बाळासह कॅनडात आहेत. त्यामुळे त्या फोनवरून या बैठकीत सहभागी होतील.
ब्रिटन आणि उत्तर अमेरिकेतील फुटीनंतर आणि आर्थिक व्यवहारांमधील स्वायत्ततेच्या मुद्दयावरून प्रिन्स हॅरी यांचे महाराणींनी मतभेद झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा हा कलह पुन्हा उजेडात आला आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निष्कर्श निघणे अपेक्षित आहे. परंतु सोमवारच्या बैठकीत आर्थिक स्वायत्तेबाबत तडजोड होऊ शकेल, अशी शक्यता दिसत नाही.