नवी दिल्ली – तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर थेट तुमच्या खात्यात 2500 रूपये जमा होणार आहेत. तामिळनाडू सरकारने पोंगल उत्सवाच्या आनंदात ही रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सर्व कार्डधारकांना तांदूळ घेण्यासाठी 2500 रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे. 4 जानेवारीपासून ही प्रोत्साहन रक्कम वितरित केली जाणार आहे.
करोडो रेशनकार्डधारकांना मिळणार लाभ –
रेशनकार्डधारकांना तमिळनाडू सरकारने स्वस्त साखर देखील पुरविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2.6 कोटी कार्डधारकांना पोंगल पॅकेजचा फायदा होणार असून पोंगल उत्सवापूर्वी त्यांचे वाटप केले जाईल. पोंगल उत्सव 14 जानेवारी रोजी आहे.
Pongal gift hampers containing Rs 2,500, rice, sugar, dry grapes, cashew, cardamom, sugarcane and a cloth bag will be given to 2.06 crores rice-drawing ration cardholders: Tamil Nadu Chief Minister Edappadi Palanisamy in Salem
(file photo) pic.twitter.com/TUb22IFcc8
— ANI (@ANI) December 19, 2020
गेल्या वर्षी दिले होते 1000 रूपये –
गेल्यावर्षीही तामिळनाडू सरकारने सर्वसामान्यांना तांदूळ खरेदीसाठी एक हजार रुपये दिले होते आणि यंदा ती रक्कम 1500 रुपयांनी वाढवून 2500 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय एक किलो तांदूळ, साखरही विनाशुल्क देण्यात येत आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या मते, 2.6 कोटी कार्डधारकांना पोंगल पॅकेजचा फायदा होईल. पोंगल उत्सवापूर्वी रेशनकार्डधारकांना ही रक्कम देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
2014 मध्ये एआयएडीएमके सरकारने राज्यातील जनतेला एक किलो तांदूळ, एक किलो साखर आणि 100 रुपये देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये ही रक्कम 1000 रुपये करण्यात आली होती आणि आता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ती वाढवून 2,500 रुपये केली आहे.