कराड (प्रतिनिधी)- येथील कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने काले (ता.कराड) येथील एक पुरुष व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आज रविवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काले येथून दोन जण टीव्हीएस मोपेडवरुन (एमएच ५०- जे ७६४२) कराडकडे येत होते. कोल्हापूर नाक्यावरील पुलाखालून शहरात येत असताना सातारा बाजूकडे वेगाने जाणार्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.
या धडकेत दुचाकीसह दोघांना ट्रकने काही अंतर फरपटत नेले. या दोघानची नावे अद्याप.समजलेली नाहीत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत .