नवी दिल्ली : कॅनडातील टोरांटो येथे तामिळनाडूतील एका विद्यार्थीनीला भोसकले.
तामिळनाडूतील विद्यार्थीनीला टोरॅंटो येथे चाकूने भोसकण्यात आले. या घटनेने आपल्या धक्का बसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे आदेश त्यांनी दिले. रशेल अल्बर्ट असे तिचे नाव आहे. तिच्या वडिलांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची याचना केली होती.