मुंबई – बॉलीवूडला नवे जोडपे अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटींगची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ते नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूड पार्टीत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा रोमँटिक पद्धतीने एकमेकांच्या जवळ जाताना दिसले. पण आपल्या नात्याबाबत या दोघांनीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही.
अशात तमन्ना आणि विजयाचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा दोघेसोबत दिसले आहे, आता लव्हबर्ड्स डिनर डेटसाठी बाहेर पडताना एकत्र दिसले. जरी दोघांपैकी कोणीही डेटिंगच्या अफवांना प्रतिसाद देत नाही आणि गप्प बसत असले तरी व्हायरल होत असलेल्या फोटो आणि विडिओमध्ये या दोघांची केमेट्री दिसून येते. नुकतेच असेच काहीसे घडले जेव्हा दोघे एकत्र दिसले.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तमन्ना पांढरा टँक टॉप आणि राखाडी जॉगर्स घातलेली दिसली, तर विजयने कॅज्युअल चेक शर्ट आणि पॅन्ट घातले होते. दोघेही एकाच गाडीतून जात होते. विजय आणि तमन्ना दोघेही कॅमेरापासून लपताना दिसले. या जोडप्याला हसू आवरता नव्हते. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आणि ते त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केव्हा करतील याची त्यांना इच्छा होती.