मुंबई – साऊथ स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया नुकतीच लस्ट स्टोरीमध्ये दिसली. या चित्रपटात ती अभिनेता विजय वर्मासोबत दिसली होती. दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आणि अनेक इंटिमेट सीन्सही दिले ज्यामुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र आता तमन्ना तिच्याकडे असलेल्या एका खास डायमंडमुळे चर्चेत आली आहे.
तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा हिरा आहे. त्याची किंमत करोडोंमध्ये आहे. विशेष म्हणजे तमन्नाला हा हिरा अंगठीसह एका खास व्यक्तीने गिफ्ट केला आहे. ही खास व्यक्ती तमन्नाच्या मित्राची बायको आहे.
तमन्नाचा हा मित्र साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार राम चरण आहे. राम चरणची पत्नी उपासना हिने तमन्ना भाटियाचा हिऱ्याच्या अंगठीसोबतचा फोटो 2019 मध्ये शेअर केला होता. जो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसोबत उपासनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘निर्मात्याकडून सुपर तमन्ना भाटियासाठी भेट. मला आतापासून तुझी आठवण येत आहे. लवकरच भेटू.
आता तमन्नाने हा जुना फोटो पुन्हा शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.तमन्नाने त्यांचे आभार मानले आणि लिहिले,”लवकरच भेटायला उत्सुक आहे, खूप मिस करते” ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातील तमन्नाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटात तमन्नासोबत अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपती, नयनतारा आणि निहारिका यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या अंगठीची किंमत 2 कोटींहून अधिक आहे. त्याची उत्कृष्ट रचना, स्टाईल आणि सुंदरतेमुळे त्याची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.