दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सौंदर्याची जादू चाहते फिदा आहे. तमन्नाचा चाहता वर्ग लाखोंच्या घरात आहे. अशात विमानतळावर तिला असा चाहती सापडली, तिची क्रेझ पाहून तमन्ना भाटिया भावुक झाली आहे. या महिला चाहतीचे प्रेम पाहून तमन्नाचा प्रियकर विजय वर्मालाही तिचा हेवा वाटेल. तमन्नाच्या प्रेमात पडलेल्या या चाहतीने हातावर तिचा टॅटूही बनवला आहे.
View this post on Instagram
बहुबली फेम एक्ट्रेस तमन्ना जेव्हा मुंबई एअरपोर्टवर पोहचली त्यावेळी एका महिला चाहती हातात गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन उभी होती. जेव्हा या चाहतीने तमन्नाला बघितले त्यावेळी पहिल्यांदा तिने पायांना स्पर्श केला नंतर त्या दोघींनी गळा भेट घेतली. यानंतर तिने हातावर काढलेला टॅटू दाखविला. तमन्ना यावेळी भावुक झाली होती.
दरम्यान, लवकरच तमन्ना आणि विजयची जोडी लस्ट स्टोरीज २ या ओटीटी चित्रपटात दिसणार आहे. तमन्ना आणि विजय पहिल्यांदा गोव्यात एकत्र सुट्टी घालवताना दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या लिंकअपच्या बातम्या येत होत्या. याआधी तमन्ना प्राइम व्हिडीओच्या रोमँटिक ड्रामा वेब सीरिज जी कारदामध्ये दिसली होती. तमन्नाचे दोन पॅन इंडिया चित्रपट येणार आहेत. ज्यात तेलुगु अॅक्शन भोला शंकर आहे. या चित्रपटात चिरंजीवी मुख्य भूमिकेत असून कीथ सुरेशही आहे.