मुंबई – ‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. सध्या या शोचे 13 वे पर्व सुरू होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस फेम मराठमोळ्या शिव ठाकरेने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. बिग बॉसप्रमाणे ‘खतरों के खिलाडी’मध्येही त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर आता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिव आता ‘खतरों के खिलाडी 13’चा पहिला फायनलिस्ट असणार आहे.
शिव ठाकरेचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘बिग बॉस मराठी’चा तो विजेता होता. हिंदी बिग बॉस आणि रोडीज देखील त्याने गाजवलं आहे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ गाजवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. नुकतेच तो ‘खतरों के खिलाडी’चा पहिला फायनलिस्ट असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना खूप आनंद झाला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’चे 13 वे पर्व यंदाही दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे. या शोमध्ये शिव ठाकरेसह ऐश्वर्या शर्मा, डेझी शाह, अर्जित तनेजा, शिझान खान, अंजली आनंद, नायरा एम बॅनर्जी, रुही चतुर्वेदीसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.