अजित पवार यांच्या सभेकडे तालुक्‍याचे लक्ष

माळेगावचा गळीत हंगाम शुभारंभ उद्या

माळेगाव  -माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 65 वा हंगाम शुभारंभ व इटीपी प्लॅन्टचे उद्‌घाटन समारंभ शुक्रवार (दि.15) सकाळी 8:30 वाजता होणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सभेकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

नुकत्याच झालेल्या सोमेश्‍वर कारखान्याच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी माळेगाव कारखान्यात यानंतर होणारे अध्यक्ष तावरे आडनाव सोडून दुसरा असेल, असे वक्‍तव्य केले होते. त्यानंतर तालुक्‍यात हे वक्‍तव्य चर्चेत आले होते. या सभेत अजित पवार हे काय बोलणार, याकडे पदाधिकारी, सभासद, गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्‍वर कारखान्याचा निकाल आदल्यादिवशी जाहीर होणार असल्याने सभेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गळीत हंगाम शुभारंभास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या

प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. यानंतर शिवतीर्थ मंगल कार्यालय शिवनगर येथे सभा होणार आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.