वाघोली (प्रतिनिधी): हवेली तालुका पंचायत समिती व तालुका तहसील विभाग यांच्या वतीने तालुकास्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन वाघोली तालुका हवेली येथील सोयरीक गार्डन मंगल कार्यालय येथे करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, हवेली उपविभाग उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, अप्पर तहसीलदार हवेली विजयकुमार चोबे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील यांनी दिली आहे.