महाराणांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नगर – हिंदू रक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदू समाज अस्तित्वात नसता अशा महाराणा प्रताप यांचा “बालभारतीच्या’ इयत्ता 7 वी च्या “इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या पुस्तकात “एकेरी’ उल्लेख करण्यात आला.

महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात जो एकेरी उल्लेख करण्यात आला, त्यातून त्यांचा अवमानच झाला आहे. हिंदू समाज हे कदापी सहन करणार नाही यासाठी महाराणा प्रताप यांचा चुकीचा उल्लेख करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती व समविचारी संघटना यांनी दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय आंदोलन करून उपचिटणीस गृह शाखा आर.जी. दिवाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना समितीचे संतोष गवळी, परमेश्‍वर गायकवाड, संजय गायकवाड, रामेश्‍वर भूकन, मनीषा कावरे, प्रमोद जरे इ. उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.