Mva-Vanchit Discussion। लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आणि मविआमध्ये युती होणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याची चर्चा पुन्हा एकदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज भूमिका जाहीर करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मविआच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना प्रस्ताव पाठवण्यात आलाय असल्याचे सांगण्यात येतंय. गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी आता वंचित बहुजन आघाडीला नवा प्रस्ताव देण्याची तयारी करत आहे. याविषयी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत येतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला दोन जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला होता. मात्र त्यानंतर चार जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही बोलणी झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनीची स्पष्ट केले होते.
प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष Mva-Vanchit Discussion।
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह असल्याचे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडीचा अंतर्गत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ते आमच्याशी काय चर्चा करणार? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. त्यांनी आधी अंतर्गत वाद मिटवावे, त्यानंतर आमच्याशी चर्चा करावी, असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांचा एकाच जागेवर सातत्याने पराभव होत आहे. त्या मतदारसंघावर आम्ही चर्चा करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. मात्र आता पुन्हा एकदा वंचित आणि मविआची चर्चा होणार आहे.
आम्हाला आंबेडकर सोबत येतील याची आशा Mva-Vanchit Discussion।
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आमची बोलणी सुरू आहे. ते महाविकास आघाडी सोबत येतील याबाबत आम्ही सकारात्मक आणि आशादायी असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. काही जागाबाबत तिढा बाकी आहे. तो चर्चेतून सुटेल, असे देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
वंचितने महाविकास आघाडीला दिलेली मुदत आज संपली ; प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष