मुंबई – राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखसोबत पहिल्यांदाच चित्रपटात काम मिळाले असल्याने तापसी खूप खूश आहे. ट्विटरवर आनंद व्यक्त करताना अभिनेत्रीने लिहीले, होय, इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता आणि जेव्हा तुम्ही स्वतः सर्वकाही करता तेव्हा ते अधिक कठीण होते.
Yes it’s hard to make it till here, n it’s harder when u r all by yourself but then a superstar once said “अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है” cheers to honesty, hard work and perseverance. Almost 10 साल लगे but finally “All is Well”😁
— taapsee pannu (@taapsee) April 19, 2022
तापसीने पुढे लिहिले, तेव्हा एका सुपरस्टारनेही सांगितले होते. ”अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है.” प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि संयमाचे फळ आहे हे. जवळपास 10 वर्षे लागली पण शेवटी ‘ऑल इज वेल’. तापसीने तिच्या ट्विटमध्ये ज्या डायलॉगबद्दल बोलले आहे तो शाहरुख खानने ओम शांती ओम या चित्रपटात बोलला होता. ऑल इज वेल हा डायलॉग राजकुमार हिरानीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 3 इडियट्सचा आहे. तापसीच्या या ट्विटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.