पर्थ : डेन वैन नीकर्क हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात इंग्लंडचा ६ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. डेन वैन नीकर्क ही सामन्याची मानकरी ठरली. तिने सामन्यात गोलंदाजीत ४ षटकात २० धावा देत ४ विकेट तर फलंदाजीत ४६(५१) धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
2/20 with the ball
46 with the batA true captain's performance from Player of the Match Dane van Niekerk 🤳#ENGvSA | #T20WorldCup pic.twitter.com/HAFsVHObfz
— T20 World Cup (@T20WorldCup) February 23, 2020
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर इंग्लंडने फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १२३ अशी मजल मारली होती. इंग्लंकडून नेटली स्कीवर ५०(४१), एमी जोन्स २३(२०) आणि फ्रैन विल्सन हिने १४(२१) धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत अयाबोन्गा खाका हिने सर्वाधिक ३, डेन वैन नीकर्क आणि मरिजेन कैपने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
For the first time in history, South Africa have beaten England at a Women's #T20WorldCup#ENGvSA pic.twitter.com/7Vt1cyu6mt
— T20 World Cup (@T20WorldCup) February 23, 2020
प्रत्युत्तरात विजयासाठीचे १२४ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने १९.४ षटकात ४ बाद १२७ धावा करत पूर्ण केले. आफ्रिकेकडून डेन वैन नीकर्कने सर्वाधिक ४६(५१), मरिजेन कैपने ३८(३३), मिगनन डू प्रीजने १८(११) आणि क्लो ट्रायाॅन हिने १२(१२) धावांची खेळी करत विजय साकारला. इंग्लंकडून गोलंदाजीत सोफी एकलेसटोन हिने २ तर आन्या श्रबसोल आणि सारह ग्लेन हिने प्रत्येकी १ विकेट घेतली.