अकोले : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंद ठेवण्या आला. तालुक्यातील प्रमुख गावांबरोबरच हा बंद खेडोपाडीही पाळण्यात आला. यानिमित्ताने अकोले येथे झालेल्या जाहीर सभेत तृप्ती देसाई यांना जिल्हा बंदी तर केली जाईल. पण त्याचबरोबर त्यांना राज्यातूनही तडीपार करण्याचा निर्धार झालेल्या सभेत महिलांनी व्यक्त केला. त्याला उपस्थित वारकरी आणि जनतेने टाळ्यांच्या गजरात समर्थन दिले.
आज तालुक्यातून आलेल्या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या भाविकांच्या मेळाव्याची सभा अकोले बाजार तळावर झाली. तत्पूर्वी अकोले येथे गावोगावाहून आलेल्या वारकरी दिंड्या व त्यांच्याबरोबर असणाऱ्या भजनांनी व त्यांना लाभलेल्या टाळ-मृदंगाच्या साथीने अकोले शहर दुमदुमून गेले होते. यानंतर भजन करीत आणि निवृत्ती महाराज तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक साथ, निवृत्तीनाथ, निवृत्ती महाराज की जय, या व अन्य घोषणा देत सर्व वारकरी व सामान्य लोक बाजार तळावर आले. तेथे सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी विष्णू महाराज वाकचौरे होते.
यावेळेस बोलताना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अकोले तालुक्याची ओळख ही इंदुरीकर महाराज यांच्यामुळे राज्याला व देशाला झाली. त्यानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी त्या झळाळीला उत्तुंग कामगिरीचा मुलामा दिला. पिचड म्हणाले, निवृत्ती महाराज देशमुख यांनीही ही अशा फालतू प्रवृत्तींना भीक घालू नये.
फेटा ठेवू नये. प्रबोधनाचे कीर्तन राज्यभर चालू ठेवावे. हा प्रबोधनाचा जागर सुरू ठेवणे म्हणजे गाडगे महाराजांचे अर्धवट व अपूर्ण राहिलेले काम पुढे चालवणे, ते सुरू ठेवण्यात चांगुलपणा राहील. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. फेटा ठेवू नका व शेती करू नका, अशा प्रकारचा सल्ला देऊन जिल्ह्यातील निवृत्ती महाराज भक्तांची तालुक्यातील जनतेला साथ राहील, असा निर्वाळा त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात विष्णुपंत वाकचौरे यांनीही वारकरी संप्रदायाचे सेवक, हरिभक्तिपरायण व प्रवचनकार शास्त्र, पुराणे यांचा अभ्यास करूनच प्रबोधन करत असतात. असे असतानाही त्यांच्या बोलण्याचा विपर्यास तृप्ती देसाई करतात, असा विपर्यास करणाऱ्या प्रवृत्तींचा व देसाई यांचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो. आमदार किरण लहामटे यांनीही निवृत्ती महाराज देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला.
आपण स्वतः बीएएमएस आयुर्वेदाची पदवी घेतली आहे आणि महाराजांच्या नावावर खपवला जाणारा पुत्रप्राप्तीचा अभ्यासामध्ये सुद्धा हा भाग आपण विद्यार्थी म्हणून अभ्यासला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी या वेळेस भाषण करताना इथून पुढे महाराष्ट्र भूषण अशी निवृत्ती महाराजांना उपाधी लावण्यापेक्षा भारत भूषण ही उपाधी लावावी, असे जनतेला आवाहन केले. यावेळेस ज्येष्ठ नेते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकरराव नवले, अशोकराव भांगरे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, शिवाजीराव धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ, अशोकराव देशमुख, महेशराव नवले, जालिंदर वाकचौरे, प्रा. चंद्रभान नवले आदींची महाराजांच्या समर्थनार्थ भाषणे झाली. तर नगर येथील स्मिता अष्टेकर यांनी आक्रमक भाषण करुन तृप्ती देसाई यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.
या बाईला जिल्हाबंदीबरोबरच राज्याच्या बाहेर तडीपार केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशारा दिला. हिराबाई आग्रे यांनी इंदुरीकर महाराज माझं लेकरू आहे. या लेकराची आम्ही काळजी घेऊ. तृप्ती देसाई तुला लेकरू नाही. त्यामुळेच तुझी भरकटलेली अवस्था आहे, असा त्यांनी टोला लगावला. सुरुवातीला दीपक महाराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
तृप्ती देसाई यांना राज्यातून तडीपार करणार ः महिलांचा निर्धार व पुरुषांचाही पाठिंबातालुक्याला पोलीस छावणीचे स्वरूप
काल व आज अकोले शहराला लष्कराच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, चाळीस पोलीस, एक आरसीएफची तुकडी यामुळे पावलात बंदोबस्त असे चित्र दिसून आले.तालुक्याला पोलीस छावणीचे स्वरूप
काल व आज अकोले शहराला लष्कराच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, चाळीस पोलीस, एक आरसीएफची तुकडी यामुळे पावलात बंदोबस्त असे चित्र दिसून आले.