पर्थ : रेचल हेंस हिच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषकामध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर ५ विकेटनी मात करत विजय नोंदविला. रेचल हेंस ही सामन्याची मानकरी ठरली.
Australia Women won by 5 wickets, AUSW 123/5 (19.3, Rachael Haynes 60, Meg Lanning 41, Udeshika Prabodhani 2/17, Shashikala Siriwardene 2/20) vs SLW 122/6 (20.0) #LionessRoar #T20WorldCup #AUSvSL pic.twitter.com/YDwDRnjLJN
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 24, 2020
श्रीलंकेच्या महिला संघाने दिलेले १२३ धावांचे आव्हान आॅस्ट्रेलियाच्या महिला संघाने १९.३ षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. आॅस्ट्रेलियाकडून रेचल हेंस हिने ६०(४७), मेन लैनिंगने ४१(४४) धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून गोलंदाजीत ऊडेशिका प्रबोधनी आणि शशीकला सिरिवर्देने हिने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने चमारी अटापटटू हिच्या ५०(३८), अनुष्का संजीवनीच्या २५(३१) आणि उमेशा तिमाशिनीच्या २०(२०) धावांच्या जोरावर २० षटकात ६ बाद १२२ अशी मजल मारली होती. आॅस्ट्रेलियाकडून निकोला कैरी आणि मोली स्ञानो यांनी प्रत्येकी २ तर जेस जोनासेन आणि मेगन शूट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.