T20 WorldCup – टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत बलाढ्य संघांना पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड आणि द.आफ्रिका सारख्या मोठ्या संघांना याचा सामना करावा लागला आहे. आजचा इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामना इंग्लंड संघ कायम लक्षात ठेवेल. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने DLS नियमानुसार आयर्लंड संघाने इंग्लंडला ५ धावांनी हरवले. त्यामुळे स्पर्धेत इंग्लंड संघाला या पराभवाचा मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर यानंतरचा दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे सुरु होण्याअगोदरच रद्द झाला.
कार्तिक आऊट झाल्याने त्याच्यावर अश्विन खूपच रागावला पण…! सांगितली शेवटच्या चेंडूची कहाणी
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यातही पावसाने अडथळा निर्माण केला होता. कमी षटकांच्या सामन्यात द.आफ्रिका बाजी मारेल असे वाटत असताना पावसाचे आगमन झाले आणि हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आफ्रिकेला २ ऐवजी १ अंकावर समाधान मानावे लागले. याप्रमाणेच सिडनी येथील हवामान खात्यानुसार उद्याचा दिवस पाऊस पडण्याची शक्यता ८० टक्के आहे आणि त्यामुळे भारताला हातच्या दोन गुणांवर पाणी सोडावे लागण्याची दाट शक्यता आहे. ( T20 WorldCup )
त्यामुळे इतर संघाप्रमाणे भारतालाही पावसाचा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. असे घडल्यास याचा सर्वात मोठा फायदा पाकिस्तान संघाला होणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. भारतीय संघ सध्या ग्रुप-२ मध्ये गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश सरस नेट रनरेटमुळे पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला उद्याचा सामना मोठ्या फरकाने जिंकून आपले नेट रनरेट वाढवण्याची संधी असणार आहे.