नवी दिल्ली – रेल्वे संघाच्या क्रिकेटला देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्चस्व (Godfather of Railways cricket) मिळवुन देणारे भारताचे प्रख्यात क्रिकेटपटू (Syed Haider Ali) सय्यद हैदर अली यांचे नुकतेच प्रयागराज येथे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
भारतीय फिरकी त्रिकुट भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना व बिशनसिंग बेदी यांच्याच काळात असल्यामुळे सय्यद यांना भारतीय संघाकडून खेळण्याची एकदाही संधी मिळाली नाही. मात्र, त्यांनी रेल्वे संघाला रणजी तसेच देशांतर्गत अनेक स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवून दिला होता.
त्यांनी रेल्वेकडून 1963-64 सालच्या रणजी मोसमात पदार्पण केले व तब्बल 25 वर्षांची कारकीर्द घडवली. ते अत्यंत भेदक डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून प्रख्यात होते. त्यांनी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 113 सामने खेळताना 366 बळी घेतले होते.
आशिया करंडक 2023 : ‘त्या’ घटनेनंतर पाकिस्तानच्या हातातून #AsiaCup2023 चे यजमानपद जाणार?
त्यात एकाच सामन्यात तीन वेळा 10, तर 25 वेळा पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. तसेच उपयुक्त फलंदाजी करताना त्यांनी 3 हजार 125 धावा केल्या असून, त्यात 3 शतके, तर 10 अर्धशतके नोंदवलेली आहेत.