सिडनी – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला व चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत होत असून हे मैदान यजमान संघासाठीच फेव्हरीट असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाने या मैदानावर आजवर 12 कसोटी सामने खेळले असून त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाने 5 सामनेजिंकले असून 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने येथे 42 वर्षांपूर्वी सामना जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाला या मैदानावर कधीही विजय प्राप्प्त करता आलेला नाही. त्यावेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 2 धावांनी पराभूत केले होते.