स्वित्झर्लंड आणि इटलीची आगेकूच कायम

माद्रिद  -स्वित्झर्लंड व इटली संघांनी आपापले सामने जिंकत युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. इटलीने मॅटेओ पेसिनाच्या गोलच्या जोरावर वेल्सचा 1-0 असा पराभव केला.

अन्य सामन्यात स्वित्झर्लंडने तुर्कीचा 3-1 असा पराभव केला व बाद फेरीतील स्थान जवळपास निश्‍चित केले. स्वित्झर्लंडच्या हेर्डन शकिरीने 2 तर, हॅरिस सफेरोविक्‍सने 1 गोल केला. तुर्कीकडून एकमेव गोल इरफान काव्हेकीने केला.

तत्पूर्वी, रॉबर्ट लेवानोव्हस्कीने महत्त्वाच्या क्षणी केलेल्या गोलच्या जोरावर पोलंडने बलाढ्य स्पेनशी बरोबरी करून दिली. ही लढत 1-1 अशी बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांच्या बाद फेरीत दाखल होण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत.

या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये स्पेनच्या अल्विरो मोराटाने 25 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पोलंडचा गोल करण्याचा एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दुसऱ्या हाफमध्येही त्यांनी भक्‍कम बचाव केला.

मात्र, जागतिक स्टार खेळाडू रॉबर्ट लेवानोव्हस्कीने स्पेनच्या खेळाडूंचा बचाव भेदताना 54 व्या मिनिटाला अत्यंत महत्त्वपूर्ण गोल केला व पोलंडला सामन्यात बरोबरी मिळवून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.