बॉलीवूड अभिनेत्री कृति सैननने आपल्या एका सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये “वर्क इन प्रोग्रेस’ असल्याचे सांगितले आहे. कृतिने इंस्टाग्रामवर एक योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यात ती ब्ल्यू रंगाच्या योगा पॅंट बाणि स्पोर्टस टॉप वियरमध्ये चक्रासन करताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, मी चक्रासन योगा करण्याचा विचार केला. परंतु मी पुन्हा विचार केला की ते परफेक्ट होणार नाही. पण मला असे वाटले की प्रत्येक गोष्ट परफेक्टच का पाहिजे? हॅशटॅग “वर्कइनप्रोग्रेस’. वास्तविक, आपण जगत नसतो, तर जीवन पुढे चाललेले असते. सदैव आनंदी रहा.
View this post on Instagram
Don’t need Monday for Motivation 💃🏻💪🏻👊🏻 #QuarantineWorkout @robin_behl14 @thetribe
यापूर्वीही कृति सैननने आपल्या इंस्टाग्रामवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. या फोटोंना कृतिच्या अनेक चाहत्यांनी लाइक्स करत त्यावर कमेंट शेअर केल्या होत्या.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कृति सैनन अखेरच्या वेळी “पानीपत’ चित्रपटात झळकली होती. तसेच ती सरोगेसीवर आधारित असलेल्या “मिमि’ चित्रपटातून लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून कृतिला खूप अपेक्षा आहेत.