स्टार फुटबॉलपटू इब्राहिमोवीचचे पुनरागमन

स्टॉकहोम – आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालेला स्विडनचा स्टार फुटबॉलपटू इल्टन इब्राहिमोविच पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनरागमन करणार आहे. तो पुन्हा एकदा स्वीडनकडून खेळणार आहे. पाच वर्षानंतर इब्राहिमोविचचे स्वीडनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. फिफा 2022 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेसाठी त्याची संघात निवड झाली आहे.

स्वीडन संघाला स्टोनियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळायचा आहे. त्यानंतर फिफा 2022 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता गटात त्यांना जॉर्जिया आणि कोसोवाविरुद्ध लढत खेळावी लागणार आहे.
फुटबॉल जगतात एक आक्रमक स्ट्राइकर खेळाडू म्हणून इब्राहिमोविच प्रसिद्ध आहे.

अनेक सामन्यांत तो प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंविरोधात आक्रमक झाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. इब्राहिमोविचने 2001 साली स्वीडनच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले. 2016 सालच्या युरो स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती घेतली होती. त्याने आपल्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 116 सामन्यांत 62 गोल केले आहेत.

1999 मध्ये व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात पदार्पण करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्‍स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मॅंचेस्टर युनायटेड यासारख्या मोठ्या क्‍लबकडून खेळला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.