बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरनंतर प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
या चित्रपटात रणदीपने केवळ अभिनय केला नाही, तर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या टीझरमधील रणदीपच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहे. ‘स्वतंत्रवीर सावरकर’ या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, या चित्रपटात वीर सावरकरांसारखे दिसण्यासाठी रणदीप हुड्डाने 26 किलो वजन कसे कमी केले आहे.
दरम्यान टीझरमध्ये दिसते की, हा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सावरकरांना मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा, सेल्युलर जेलमध्ये त्यांचा झालेला छळ अशा अनेक गोष्टींची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच टीझरमध्ये महात्मा गांधी यांचा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
अभिनेता रणदीपने टीझर शेअर करत त्याने लिहिले आहे, “भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक… इंग्रजांनाही सर्वात जास्त भीती वाटायची असं व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य आणि इतिहास जाणून घ्या… ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे”.
View this post on Instagram