नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 125 वर्षीय योगगुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी शिवानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाकून नमस्कार केला. यानंतर पीएम मोदींनीही उठून त्यांना नमस्कार केला.
जेव्हा शिवानंद राष्ट्रपतींकडून पुरस्कार घेण्यासाठी आले तेव्हा ते त्यांच्यासमोरही नतमस्तक झाले. राष्ट्रपतींनीही शिवानंद यांचा हात हातात घेऊन त्यांना मिठी मारली. शिवानंद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 साली झाला. गुरू ओंकारानंद यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी योग आणि ध्यानात प्रभुत्व मिळवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया यांसारख्या देशांमध्ये फिरून आले आहे. दरम्यान, शिवानंद यांच्या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.