मुंबई : हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुजन खान अनेकवेळा भेटतात आणि मुलांबरोबर मस्त एकत्र टाईमपास करतात, हे अनेकवेळेस बघितले गेले आहे. रविवारीही या पूर्वाश्रमीच्या पती-पत्नीला एकत्र बघितले गेले होते.
आयरिश बॅन्ड “यु 2’च्या कॉन्सर्टला हे दोघेही आपल्या मुलांसह उपस्थित होते. यावेळी रणवीर-दीपिका, शाहिद कपूर-मीरा, आलिया भटची बहिण शाहिन, अनुराग कश्यप आणि सचिन तेंडूलकरसारखे सेलिब्रिटीही आले होते. यावेळी हृतिकने मुले आणि सुजनबरोबर आनंदात वेळ घालवला.
त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हृतिकने स्वतःच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. सुजननेही काही फोटो शेअर केले आहेत. हृतिकबरोबर ती देखील खूप खुशीत दिसत होती. तिने या कॉन्सर्टमधील काही गाण्यांचे कौतुकही केले आहे. जवळपास दशकभराच्या संसारानंतर हृतिक आणि सुजन विभक्त झाले होते.
त्यांच्या घटस्फोटाला कंगणा रणावत कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्यांच्यातील दुरावा कमी झाला आणि दोघेही पुन्हा भेटायला लागले. हे दोघे पुन्हा लग्न करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचेही ऐकिवात आहे.