मुंबई – सुपरस्टार असण्यासोबतच हृतिक रोशन एक फॅमिली मॅन देखील आहे. जो अनेकदा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. मग आपल्या मुलांसोबत सुट्टीवर जाणे असो किंवा बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत जाणे असो ह्रितिक नेहमीच कुटूंबाला प्राधान्य देतो. नुकतंच ह्रितिकच्या फॅमिली पार्टीमध्ये त्याची चर्चित गर्लफ्रेंड सबा आझाद देखील दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनचा वाढदिवस नुकताच कुटुंबीयांनी साजरी केला. त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण रोशन कुटुंब दिसत आहे. यासोबतच हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादही दिसत आहे. यावरूनच आता नेटकऱ्यांनी ह्रितिकला टार्गेट केल्याचं दिसून येते.
View this post on Instagram
सुनैना हृतिकपेक्षा वयाने मोठी आहे आणि लाइम लाईटपासून दूर राहते. बॉलिवूडच्या पार्ट्या किंवा कार्यक्रमांमध्ये तो क्वचितच दिसतो. हृतिक मात्र आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. रोशन कुटुंबाने साजरा केलेल्या या जन्म दिवसाचे फोटोज आता नेटकऱ्यांनी शेअर करत ह्रितिकला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काहींनी ह्रितिकच्या बहिणीला शुभेच्छा दिल्यात तर काहींनी हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचे सांगत का नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.