मुंबई – आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. रणबीर त्याच्या ऍनिमल चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत होता, परंतु या खास दिवशी त्याने आपल्या पत्नीसाठी वेळ काढला आणि तिला भेटण्यासाठी मुंबईला परतला. त्यावेळेसचा रणबीरचा एअरपोर्ट व्हिडिओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये तो महागड्या ब्रँडची बॅग घेऊन जाताना दिसत आहे.
रणबीर कपूरच्या हातात एवढी महागडी बॅग पाहून सर्वांच्याच नजरा त्यावर खिळल्या आणि एरपोर्टवरील रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरू लागला. रणबीर हातात जी बॅग घेऊन दिसला ती एका बड्या फ्रेंच ब्रँडची आहे. अभिनेत्याचा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी लगेचच असा अंदाज लावायला सुरुवात केली की रणबीरच्या हातातली ही महागडी बॅग त्याच्या पत्नीसाठी आहे, जी त्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भेट म्ह्णून आणली आहे.
सोशल मीडियावर तर अनेक चाहत्यांनी या ब्रँडची हिस्ट्री,जॉग्रफि सर्वकाही माहिती करून घेत अनेक तर्क वितर्क लावले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या फ्रेंच ब्रँडच्या बॅगची किंमत तब्बल 10 लाख इतकी आहे. यावरूनच रणबीरने आलियासाठी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणल्याचे समजते. रणबीरच्या दृष्टीने हे गिफ्ट खास आहे करकोळ किमतीचे असले तरी सर्वसामान्यांसाठी ही किंमत खूप जास्त आहे.
View this post on Instagram
लग्नाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या नवीन घराच्या बांधकाम साइटलाही भेट दिली.यावेळी आलियाच्या हातामध्ये एक बॅग देखील दिसली अनेकांनी ही रणबीरने गिफ्ट केलेली बॅग असल्याचे सोशल मीडियावर म्हंटले आहे. ‘एवढ्या किमतीत तर एक एसयूव्ही येईल अशी कमेंट एका युजरने यावेळी केली आहे. तर एका चाहत्याने ‘लकी आलीया’ असे म्हंटले आहे. रणबीर आलियाची केमेस्ट्री पाहून चाहते मात्र चांगलेच खुश झाले आहेत.