श्रीनगर : येथील कावदरा भागता दहशतवाद्यांनी तैनात असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या दिशने हातबॉम्ब फेकले. त्यात अद्याप कोणतीही जीवीत हानी झल्याचे वृत्त नाही.दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात एक 16 वर्षीय किशोर जखमी झाला आहे. तर दोन वाहनांचे नुकसान झाले. पोलिस दलाच्या दिशने फेकलेल्या हातबॉम्बचा नेम चुकला आणि रस्त्याच्या कडेला फूटले. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या घटनेने नागरिकांत घबराट पसरली आहे. यात दोन खासगी वाहनांचे नुकसान झाले. जखमी झालेल्या मुलाला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही.
या घटनेनंतर या संपूर्ण भागाची नाकाबंदी करून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या दहशतावाद्यांना लवकरच गजाआड केल जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.