Nitasha Kaul। देशात कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. त्यातच नुकतेच बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली. वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापिकेला भारतात प्रवेश देण्यात आला नाही. निताशा कौल असे प्राध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी आपल्याला बेंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तसेच लंडनला परत पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. कौल यांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
लंडनस्थित काश्मिरी पंडित निताशा कौलयांनी ट्विटरवर एकापाठोपाठ पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.यात त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केलाय. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची सूचना किंवा नोटीस सरकारकडून मिळाली नाही. तसेच आपल्याला देशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे कारणही सांगण्यात आले नाही असे म्हटलं.
सिद्धरामय्या सरकारकडून तात्काळ कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सरकारने 24-25 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय संविधान आणि राष्ट्रीय एकता परिषद-2024 आयोजित केली होती. ज्यामध्ये कौल यांना आमंत्रित करण्यात आले होते. कौल या कादंबरीकार, लेखिका आणि कवयित्री आहेत.
निताशा कौलने कर्नाटक सरकारने तिला दिलेल्या निमंत्रण आणि इतर परिषदेशी संबंधित पत्रांचा फोटो शेअर केला आहे. लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांवर बोलण्यासाठी तिला भारतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. मला कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सन्माननीय प्रतिनिधी म्हणून एका परिषदेसाठी आमंत्रित केले होते, परंतु केंद्र सरकारने मला प्रवेश करण्यास मज्जाव केला. माझे सर्व दस्तऐवज आणि वर्तमान यूके पासपोर्ट कायदेशीर आहेत. यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती यामुळे त्यांना देशात प्रवेश दिला नसल्याचा आरोप त्यांनी केलीय.
कोण आहे निताशा कौल? Nitasha Kaul।
निताशा कौल ही काश्मिरी पंडित आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर त्या नेहमी लिखाण करतात. तसेच याच मुद्द्यावर भाषणदेखील देतात. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाबाबत त्यांनी युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन फॉरेन अफेअर्ससमोर साक्ष दिली. याशिवाय तिने ‘द काश्मीर फाइल्स’वरही टीका केली आहे.
कौल यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. 1997 मध्ये ती लंडनला गेली. 2002 नंतर, त्या पाच वर्षे ब्रिस्टल बिझनेस स्कूलमध्ये अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक होत्या. निताशा आता वेस्टमिन्स्टर विद्यापीठात राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची असोसिएट प्रोफेसर आहे.