HBD Sushmita: ‘या’ प्रश्नाचं अनोखं उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता मिस इंडियाचा किताब

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताचा जन्म हैद्राबादमध्ये झाला. तिचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. तर आई दुबईमध्ये ज्वेलरी डिझायनर होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)


दरम्यान, सुष्मिता सेन बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. तिने ‘मिस इंडिया’चा किताब देखील जिंकला होता. ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने एका साध्या टेलरकडून तयार करवून घेतलेला ड्रेस परिधान केला होता. हा अनुभव स्वत: सुष्मिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताने 1994 मध्ये जेव्हा ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. सुष्मिता तेव्हा एक मध्यमवर्गीय मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्यामुळे “मिस इंडिया’ स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता आईने आणि मीना बाजारातील एक टेलर यांनी मिळून शिवले होते. हा ड्रेस तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताने ‘मिस इंडिया’ ही स्पर्धा एका प्रश्‍नाच्या उत्तराने जिंकली असल्याचे म्हटले जाते. त्या स्पर्धेत सुष्मिताला एक अनोखा प्रश्‍न विचारण्यात आला होता. जर तुला एखादी ऐतिहासिक घटना बदलण्याची संधी मिळाली तर तू कुठली घटना निवडशील? या प्रश्‍नावर इंदिरा गांधी यांचा मृत्यू असे उत्तर सुष्मिताने दिले होते. या उत्तरामुळे सुष्मिता “मिस इंडिया’चा किताब जिंकली असे म्हटले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.