मुंबई : मुंबईतील शिवसेने(उद्धव ठाकरे गट )च्या महिला पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे दोन्ही शब्द चर्चेत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर देण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग बोलून दाखवला होता, त्यांच्या याच डायलॉगचा आता समाचार ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा’ या डायलॉगबाजीवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी अमृता फडणवीस यांचा देखील उल्लेख केला आहे.
“झुकेगा नही घुसेगा साला” हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही #घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!@ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @AUThackeray @OfficeofUT
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 5, 2023
“झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंचे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करण्यात येत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली तसेच आणि त्यांच्या गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यावरूनच आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला आहे.