मुंबई – बी टाऊनच्या आवडत्या जोडप्यांच्या यादीत असलेल्या अभिनेत्री माहिरा शर्मा आणि अभिनेता पारस छाबरा यांचे ब्रेकअप झाले आहे. ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे वेगळे झाले आहेत. पारस छाबरा यांनीही माहिरासोबतच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.
माहिरा शर्मा आणि पारस छाबरा गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना गुपचूप डेट करत होते. हे जोडपे लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यांचे नाते खूप मजबूत होते, परंतु आता ते वेगळे झाले आहेत. माहिराच्या एका मित्राने याचा खुलासा केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, माहिरा आणि पारसमध्ये बराच काळ तणाव होता. त्यांच्यात भांडण व्हायचे, अशात दोघांनी गेल्या महिन्यात वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकअपमुळे “माहिरा दुःखी आहे. पण आता ती बरी आहे आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.’
माहिराने पारससोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावर डिलीट केले असून तिने पारसला अनफॉलोही केले आहे. विशेष म्हणजे, पारस याआधी आकांक्षा पुरीला डेट करत होता आणि नॅशनल टीव्हीवर तिच्यासोबत ब्रेकअप झाला होता. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, माहिरा लवकरच पंजाबी चित्रपट Lehmberginni मधून पदार्पण करणार आहे.