मुबई – बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी 14 जून 2020 जून रोजी आत्महत्या केली होती. या घटनेला दोन वर्ष होऊन गेलेली असताना देखील या प्रकरणातील राजकारण मात्र काही केल्या थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंहचा पोस्टमार्टम करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा करत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुशांत सिंह प्रकरण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसतंय. नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये रुपकुमार शाह हे एक मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सुशांत सिंहच्या वेळेसचा असेल तर सुशांत सिंह प्रकरणात आरोप करणारे रुपकुमार शाह त्यावेळी तिथे उपस्थित असल्याचे स्पष्ट होते. हा व्हिडीओ पोस्ट करत नितेश राणे म्हणतात,हे स्पष्ट आहे की रुपकुमार शाह हा सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणारा माणूस होता,पीएम होत असताना ते तिथे होते. शेवटी सत्य बाहेर येणार आता बेबी पेंगवीन दूर नाही”.
It’s clear that Roop Kumar shah was the man carrying SSR s body..
He was there during the PM..
the truth is finally coming out..
Ab baby penguin door nahi hai..
Justice will be done! pic.twitter.com/RiQo0PVeuR— nitesh rane (@NiteshNRane) January 2, 2023
रुपकुमार शाह यांनी केलेलं आरोप
रुपकुमार शाह म्हणाले होते की, “जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह आले होते. त्यामध्ये एक व्हीआयपी मृतदेह असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, जेव्हा मृतदेहावरचा कपडा काढला तेव्हा शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. गळ्यावर दोन-तीन वर्ण होते. असं त्यांनी सांगितलं होत
जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी वरिष्ठांना सांगितलं, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करायला हवं. पण ते म्हणाले लवकर फोटोंवर काम करायचं आहे आणि मृतदेह ताब्यात द्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही मुतदेहावर काम सुरु केलं. असं ते म्हणाले होते. तसेच ही आत्महत्या नसून हत्या असलयाचे देखील त्यांनी म्हंटले होते.