मुंबई : लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने फास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे.
सुशांतने ३ जूनला आईच्या आठवणीतील शेवटची इन्स्टा पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की,”अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई”
https://www.instagram.com/p/CA-S3cIDWOx/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान,सुशांतने ‘केदारनाथ’, ‘एम एस धोनी’ आणि छिछोरे सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या मॅनेजरने देखील आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.