सुशांतसिंह राजपूत प्रकरण : सीबीआय चौकशीची शिफारस मान्य

 सर्वोच्च न्यायालयात केंद्राची माहिती

नवी दिल्ली – अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचे सत्य समोर आले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. दरम्यान, बिहार सरकारच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे हा प्रस्ताव पाठवण्याची शिफारस केंद्राने मान्य केली असल्याची माहिती न्यायालयाला दिली.

न्यायमूर्ती हृषिकेश राय यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र आणि बिहार सरकार तसेच सुशांतसिंह राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंह यांना अभिनेत्री रिया चक्रवतीच्या याचिकेवर तीन दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

रिया चक्रवर्ती यांनी 24 जुलै रोजी पटनातील राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली एफआयआर मुंबई पोलिसांकडे पाठविण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. एफआयआरमध्ये रियाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रिया यांच्या याचिकेची नोंद पुढील आठवड्यासाठी केली आणि मुंबई पोलिसांना सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सुशांतसिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या उपनगराच्या वांद्रे येथे राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले होते. तेव्हापासून मुंबई पोलीस विविध बाबी लक्षात घेऊन त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की बिहार सरकारची सीबीआय चौकशी शिफारस मान्य करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.