मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रुग्णालयातून घरी

भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोविड सेंटर रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

कोविड नियमावलीनुसार पुढील सात दिवस शिवराज सिंह घरातच सर्व खबरदारी घेऊन राहणार आहेत. त्याचबरोबर त्यांची नियमित आरोग्य चाचणीही करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची 25 जुलै रोजी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना कोविड सेंटर चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयानुसार शिवराज सिंह यांना तीन दिवसांपासून ताप आलेला नाही तसेच इतर क्‍लीनिकल टेस्टही नॉर्मल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.